आमच्यासाठी पोलीस व्हॅन वरील लुकलुकणारा दिवा म्हणजेच आकाश कंदिल,
पोलीस व्हॕनच्या सायरन चा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज,
तर संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच आमची दिवाळी..!😊
*दिवाळी सणाच्या शुभेच्छा*
*-महाराष्ट्र पोलीस*
दिवाळीच्या शुभेच्छांच्या गर्दीत हा एक मेसेज व्हाट्सअपवर फिरत आहे. वाचल्यावर किती मनाला चटका लावून जाणारा वाटतो ! महाराष्ट्रात सगळीकडे धुमधडक्याने दिवाळी साजरी होत असताना, महाराष्ट्र पोलीस मात्र जनतेला दिवाळी आनंदात व सुखसमाधानात साजरी करता यावी, याकरीता चोवीस तास प्रयत्न करताना दिसतो. त्याला कधी सणासुदीला मिळणाऱ्या सरकारी सुट्टयांचा उपभोग घेता आलेला नाही, की एखादा सण आपल्या बायको, मुलांसोबत आनंद साजरा करता आला नाही. आपली व्यथा सरकार दरबारी मांडणे त्याच्यासाठी अशक्य आहे. मागील काही महिन्यांपासून सरकारने त्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली, हे एवढेच काय ते सुख ! पण त्यातही काही न काही अडचणी निर्माण होऊन क्वचितच सुट्टीचा आनंद घेता येतो. कोणत्याही धार्मिक सणाला कायदा व सुव्यवस्था राखली जावी, याकडे पोलीस कायम लक्ष ठेऊन असतो. जनतेला कोणताही त्रास सहन करावा लागू नये, एवढेच त्याचे ध्येय.
कित्येक वेळेस जनतेला वेठीस धरून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करण्याचे प्रकार विविध संघटनांकडून केले जात असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे ऐन दिवाळी सणाचे तोंडावर एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता संपाचे हत्यार उपसले आहे. सणासुदीला मोठ्या प्रमाणात जनता एस.टी. प्रवास करते. ' एस.टी. चा प्रवास, सुखाचा प्रवास', अशा उद् घोषणा देऊन जास्तीतजास्त लोकांना एस.टी. तून प्रवास करण्यासाठी आकर्षित केले जाते. आता देखील कित्येक जणांनी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी परगावी जाण्याचा बेत आखला असेल. पण या संपामुळे त्यांचा आनंदावर पाणी फिरले असेल. आता देखील पोलीस कोठेही दंगा होऊन सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्त्यावर उभा राहून आपले कर्तव्य पार पडताना दिसतो आहे. लवकरच मंत्री महोदयांसोबत वाटाघाटी होऊन संंपावर तोडगा निघेल व पुन्हा सर्व काही सुरळीत होईल व जनतेचा प्रवास सुखकर होईल, ही आशा !
जनता सुट्टीचा उपभोग कुटुंबासोबत घेत असताना, पोलीस मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात गुंतलेला दिसतो. याबाबत मनात खंत असताना देखील तो आपले मानसिक संतुलन बिघडू देत नाही. आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करू शकत नसल्याने, सोशल मीडियाचा वापर करून काव्यात्मक पद्धतीने मांडलेले हे विचार किती हृदयस्पर्शी वाटतात. याचा कोठेतरी विचार होणे आवश्यक आहे. अशा महाराष्ट्र पोलिसांना सलाम केल्याशिवाय रहात नाही.
अजित दत्तात्रय केसरकर
सलाम महाराष्ट्र पोलीस...
ReplyDeleteछान दादा....
मस्त दादा ..अगदी महत्त्वाच सांगितलं
ReplyDeleteपोलिसांची व्यथा अगदी योग्य शब्दात मांडली आहे.पोलिसांची संख्या वाढवून आळीपाळीने का होईना त्यांना १-२ दिवस तरी सणाला सुट्टी दिली पाहिजे.
ReplyDeleteVery true lines...appreciated
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteWish you and our police staff a happiest Deepawali...
ReplyDeleteWish you and our police staff a happiest Deepawali...
ReplyDeleteGood note on police who works really hard for public.
ReplyDelete